मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत असलो तरीही मी अद्याप एक विद्यार्थीच आहे. खूप काही शिकावे लागणार आहे. महेंद्रसिंह धोनीने यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वीच नेतृत्व सोडले व त्याची जबादारी माझ्यावर आली. यंदाच्या मोसमात आम्ही सलग पराभवांची मालिका मंगळवारी खंडित केली, याचा आनंद आहेच पण येत्या काळात हे विजयी सातत्य कायम राखण्याचा आमचा मनोदय आहे, असे चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा याने म्हटले आहे.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा पराभव करत चेन्नईने यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय साकार केला. त्यात जडेजाने 3 गडी बाद करत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. बेंगळुरूविरुद्ध या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत जडेजाने सर्वात जास्त 26 बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे.