खडकवासला – येथील रक्तदान शिबीरात एकशे वीस बाटल्या संकलित करण्यात आले. खडकवासला गावचे माजी सरपंच शिवसेनेचे माजी तालुका संपर्कप्रमूख संदीप मते यांच्या वाढदिवसा निमित्त पुना सिरॉलॉजिकल इंस्टिट्यूटच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
खडकवासला पंचक्रोशीतील तरुणांनानी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. शिबीराचे उद्घाटन . शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, खडकवासला विधानसभा प्रमुख नितीन वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब सणस , महेश मते, सुरेश मते ,नंदकिशोर मते , दिगंबर कोल्हे, अनिकेत मते, आशिष मते, गोकुळ करंजावणे ,सुवर्णा करंजावणे, अशोक मते ,अमोल मते ,स्वप्नील मते, हरेश मते, संतोष शेलार, सौरभ मोकाशी ,अमर मते ,विजय मते, सागर मते, बबलू मते ,विशाल मते, दीपक मते ,रुपेश मते ,तन्वीर शेख, नीलेश मते, गोरक्षनाथ मते,अनिल गायकवाड ,अनिल मते, अजय मते आदि कार्याकर्त उपस्थित होते.