पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर ही एक उद्योगनगरी आहे. येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवक कामासाठी येतात. परंतु बहुतांश युवकांना काम मिळत नाही. तेव्हा ज्या युवकांची रिक्षा घेण्याची इच्छा आहे परंतु पैसे नाहीत अशा युवकांना शंभर टक्के लोन मिळवून देऊन परमिटसह रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सार्थ टीव्हीएस ऑटोचे संचालक सुनील बर्गे यांनी सांगितले.
दै. प्रभात कार्यालयात गणरायाची आरतीसाठी आले असता त्यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले उपस्थित होते. या वेळी सुनील बर्गे म्हणाले, सार्थ ऑटोच्या माध्यमातून ज्या युवकांकडे पैसे नाहीत परंतु काही तरी करण्याची इच्छा आहे अशा युवकांना रिक्षा परमिट, बॅच तसेच बॅंकाशी संपर्क करून शंभर टक्के लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
तसेच त्यांना रोजगाराचे साधन निर्माण करून दिले जात आहे. त्याचबरोबर महिलांसाठी देखील रिक्षा प्रशिक्षण व रिक्षा लोनद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रिक्षाचालक निर्व्यसनी राहण्यासाठी विविध शिबिरे घेण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यासाठी त्यांना त्यांची पत्नी मनीषा बर्गे सहकार्य करतात.