नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने (Election commision) सोमवारी सांगितले. तर छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. (5 State Assembly Elections 2023)
या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. निकालापूर्वीचा सी वोटर्सचा (C voters servey) एक सर्वे देखील समोर आला आहे. ज्यानुसार अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांना धक्का पोहचणार असल्याचे समजते. निवडणुकांचे बिगुल वाजलेल्या राज्यांमध्ये सध्या कोणत्या पक्षाची स्थिती कशी आहे. याची आकडेवारी आपण पाहणार आहोत. (5 state election result)
पाच राज्यांमध्ये अशी आहे स्थिती
मध्य प्रदेश
एकूण जागा : 230
भाजपा : 128
कॉंग्रेस : 98
अपक्ष : 3
मुख्यमंत्री : शिवराजसिंह चौहान, भाजपा
राजस्थान
एकूण जागा : 200
कॉंग्रेस : 108
भाजपा : 70
अपक्ष : 13
राष्ट्रीय लोक दल : 1
(13 अपक्ष आणि एक रालोद सरकारमध्ये सहभागी)
मुख्यमंत्री : अशोक गेहलोत, कॉंग्रेस
तेलंगण
एकूण जागा : 119
भारत राष्ट्र समिती : 99
कॉंग्रेस : 7
एमआयएम : 7
मुख्यमंत्री : के. चंद्रशेखर राव
छत्तिसगड
एकूण जागा : 90
कॉंग्रेस : 71
भाजपा : 15
बसपा : 2
मुख्यमंत्री : भूपेश बघेल, कॉंग्रेस
मिझोराम
एकूण जागा : 40
मिझो नॅशनल फ्रंट : 27
झोरम पिपल्स मूव्हमेंट : 6
कॉंग्रेस : 5
मुख्यमंत्री : झोरमथंगा, मिझो नॅशनल फ्रंट
काय सांगतोय निकालापूर्वी सर्वे
या ओपिनियन पोलनुसार (5 State Opinion Polls) राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसू शकतो. येथे भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. तसेच, मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो, परंतु त्याची भाजपशी कडवी स्पर्धा आहे. तेलंगणातील सत्ता बीआरएसकडून काँग्रेसकडे जाऊ शकते. याशिवाय मिझोराममध्ये कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाही. अशा स्थितीत सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला मोठा धक्का बसू शकतो कारण सत्तेची चावी अन्य पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे.