आळंदी – राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या राज्य संघटक सचिवपदी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोरूडे तर रामदास रानवडे यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे प्रमुख राज्य समन्वयक ह. भ. प. विठ्ठल आबा मोरे यांनी हे नियुक्ती पत्र आळंदी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिले. यावेळी आमदार अशोक पवार, वारकरी आघाडी उपाध्यक्ष ह.भ.प. मोहनानंद महाराज, मुबारक शेख यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.