पिंपरी – सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई आहे. हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सची देखील दमछाक होते.
मात्र, महापौर माई ढोरे यांचा नातू व जे डी ट्रेकर्सचा सभासद अद्वैत्य भूषण शिंदे याने वयाच्या आठव्या वर्षी व अवधूत तानाजी भोंडवे (वय 15) यांनी अवघ्या 3 तास 17 मिनिटांत हे शिखर सर केले.
ट्रेकिंगची आवड असलेला अद्वैत्य शिंदे याला वडील भूषण शिंदे यांच्याकडून ट्रेकिंगचे बाळकडू मिळालेले आहे. गणेश वाजे, महेंद्र कुदळे, भूषण शिंदे, केतन कुंजीर, ओंकार स्वामी, मंगेश कोद्रे, राजेश ढोरे, पप्पु ससार, मयूर पातुरडे, महापौर माई ढोरे व जे डी ट्रेकर्सचे मार्गदर्शक जवाहर ढोरे यांनी अद्वैत व अवधुत यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.