विद्यापीठ अनुदान मंडळाची पगारश्रेणी शासनास मान्य
मुंबई, दि. 15 – विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने शिफारस केलेली नवी पगारश्रेणी सरकारने स्वीकृत केली आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ व विद्यापीठ यांनी शिफारस केलेली पात्रता असलेल्या शिक्षकांना या नव्या वेतनश्रेणीचा लाभ मिळेल. ज्यांची केवळ विद्यापीठाने शिफारस केलेली पात्रता असेल त्यांनी जर 5 वर्षांच्या काळात विद्यापीठ अनुदान मंडळाने शिफारस केलेली पात्रता मिळविली नाही तर त्यांची वार्षिक पगारवाढ रोखली जाईल.
आता कृत्रिम तेल!
जेरुसलेम – वाळवंटी भागातील खाऱ्या व निरुपयोगी पाण्यात वाढविलेल्या जंतूंपासून इस्रायली सैनिकांनी तेल तयार केले असून नवे तेल पेट्रोलियमला पर्याय म्हणून उपयोगी पडू शकते काय, हे बघण्यात येणार आहे, असे येथील हिब्रू विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे.
धूम्रपानाने मेंदूला धोका!
मुंबई- धूम्रपान करण्याने मेंदूचे नुकसान होते. कारण रक्तातील घटकांच्या रासायनिक प्रमाणात धूम्रपानाने बदल होतो, असे जर्मन संशोधक डॉ. क्लॉस क्लाउसेन यांनी म्हटले आहे. धूम्रपानाने इन्शुलिनद्वारा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून माणसाला बरे वाटते व यामुळेच तो धूम्रपान सोडत नाही व मेंदूचे होणारे नुकसान चालूच राहते.