वॉशिंग्टन – पृथ्वीची श्वसन यंत्रणा म्हणजेच पृथ्वीचे फुफुस म्हणून ओळख असलेल्या ॲमेझॉन रेन फॉरेस्टचे अस्तित्वच संकटात आले आहे 2000 सालानंतर ग्लोबल वार्मिंगचा मोठ्या प्रमाणावर फटका ऍमेझॉन रेनफॉरेस्टलाही बसला असून या फॉरेस्टमध्ये असलेली जैवविविधताही संकटात आली आहे.
सुमारे पन्नास लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रात वसलेल्या ॲमेझॉन फॉरेस्ट मध्ये जगात आढळणाऱ्या बहुतेक सर्व प्रकारच्या जैविक प्रजाती आढळतात जगात आढळणाऱ्या प्रजातींपैकी 10 टक्के प्रजाती ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये अस्तित्वात आहेत या रेन फॉरेस्ट मध्ये चार हजार पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे 2000 पेक्षा जास्त विविध प्रकारचे मासे 1200 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी चारशे सस्तन प्राणी 400 उभयचर प्राणी आणि 375 सापांच्या जाती या सर्व जीवांचे घर आहे त्याशिवाय ॲमेझॉन रेन फॉरेस्ट क्षेत्रामध्ये 25 लाखांपेक्षा जास्त विविध प्रकारच्या किटकांचाहेही अस्तित्व आढळल्याची नोंद आहे.
पण आता 2000 सालानंतर ग्लोबल वार्मिंगचा मोठ्या प्रमाणावर फटका ॲमेझॉन रेन फॉरेस्टला बसला असून या फॉरेस्ट चे वनक्षेत्र कमी होत असल्याने त्याचा जैवविविधतेलाही फटका बसला आहे वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने ॲमेझॉन फॉरेस्ट मध्ये सापडणाऱ्या अनेक जिवांना या बदलत्या वातावरणाशी जमून घेणे शक्य झालेले नाही त्यांच्या क्षमते बाहेर ही गोष्ट आहे.
ॲमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये ज्या ठिकाणी मानवाने अतिक्रमण केले आहे किंवा ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्या ठिकाणच्या जिवांना सर्वात जास्त फटका बसल्याचे एका संशोधनात म्हणण्यात आले आहे रेन फॉरेस्टच्या पर्यावरणात ज्या झपाट्याने बदल होत आहे तो वेग तेथे आढळणारा जीवसृष्टीला पकडणे शक्य नसल्याने त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड होत असल्याने त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे