मॉस्को – रशियाच्या सैबेरियात भडकलेल्या भीषण वणव्यामुळे काही गावांना धोका निर्माण झाला आहे. या भागातील रहिवाशाना तातडीने ङा भाग रिकामा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सबेरियाच्या वायव्येकडील साखा-याकुकतिया या भागातील 10.1 लाख हेक्टरवरील वन संपदेपैकी 93 टक्के वनसंपदा या वणव्यामध्ये जळून भस्मसात झाली आहे. ब्यास-कुएल या गावातील डझनभर घरा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या गावांमधील रहिवाशांना स्थानिक कृती दलांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. क्याटल डेरा, सिन्स्क, येडयाल आणि इतर अनेक वस्त्यांजवळही आग लागली आहे. या भागातील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरत आहे.
या भागातील तेल पुरवठा प्रकल्पाला या वणव्यापासून वाचवण्यासाठी अधिकारी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
अलिकडच्या काळात रशियात तापमान वाढ खूप मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली आहे. हा बदल हवामान बदलामुळे झाला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. वाढत्या तापमानाबरोबरच अग्निसुरक्षेच्या उपाय योजनांची वानवा असल्यामुळेही ही आग झपाट्याने पसरत चालली आहे.