मुंबई – ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असला तरी, अभिनेता अजय देवगणनच्या या चित्रपटाच्या रिमेकने 2015 मध्ये एक जबरदस्त थ्रिलर कथा लोकांना दिली आहे. आणि त्यानंतर गेल्या 7 वर्षांपासून चाहते ‘दृश्यम 2’ ची वाट पाहत होते. मात्र, अखेर ‘दृश्यम 2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, चित्रपटाच्या कथेने सिनेरसिकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे. यंदाच्या या ‘दृश्यम 2’ चित्रपटात एक नवीन मजबूत पात्र जोडले गेले आहे, हे पात्र म्हणजे, अभिनेता ‘अक्षय खन्ना’ सिनेमात या अभिनेत्याचा जबरदस्त लुक आणि ऍक्टिंग प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
आणि याच मुळे हा चित्रपट अद्यापही बॉक्स ऑफिसवर तग धरून राहिला आहे. त्यामुळेच का होईना अभिनेता वरून धावनाचा ‘भेडिया’ चित्रपट मागे पडल्याचं दिसून आला आहे. सध्या अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली आहे.
अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात यशस्वी ठरला असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या बुधवारी चित्रपटाने 4.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 159.39 कोटींवर गेली आहे. दरम्यान, ह्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत थोडीफार घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.