मुंबई – गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा वाद सुरु झाला. त्यानंतर मनोरंजनसह राजकीय वर्तुळातील अनेक व्यक्तींनी याबाबत भाष्य केलं. चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी पुन्हा एकदा याबाबत भाष्य केलं आहे. काश्मीर फाइल्स हा चित्रपट अप्रतिम असून प्रचारकी चित्रपट असल्याचे स्पष्ट मत लॅपिड यांनी व्यक्त केलं आहे. एका इंग्रजी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
प्रोपोगंडा म्हणजे काय हे कोणीही ठरवू शकत नाही. परंतु मी हे सत्य स्वीकारतो की,’काश्मीर फाईल्स हा एक अप्रतिम चित्रपट आहे. मी जे पाहिलं ते सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी बोललो असं स्पष्ट मत लॅपिड यांनी यावेळी व्यक्त केले. इतर ज्युरींना देखील हेच वाटलं परंतु त्यांनी बोलणं टाळलं तसेच काश्मीर फाइल्स हा एक प्रचारकी चित्रपट असून त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान नाही असही लॅपिड यावेळी म्हणाले.
हा चित्रपट राजकीय दबावामुळे इफ्फीमध्ये समाविष्ठ करण्यात आल्याचे देखील नदाव लॅपिड यावेळी म्हणाले.इफ्फीमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळॆ मोठा वाद झाला होता. ज्युरी लॅपिड यांनी या चित्रपटाला व्हल्गर आणि प्रोपोगंडा म्हंटल्याने या चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा देशभर व्हायला सुरुवात झाली होती.