Dr. S. Jayashankar – परराष्ट्र व्यवहार मंत्री,डॉ.एस.जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची लंडन इथल्या 10 डाऊनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने जयशंकर यांनी सुनक दाम्पत्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
भारत आणि ब्रिटन सध्याच्या काळात आपले संबंध अधिक वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत,असेही जयशंकर यांनी म्हटले आहे. डॉ.जयशंकर या दौऱ्यात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री,जेम्स क्लेव्हर्ली यांच्यासह इतर मान्यवरांची भेट घेणार आहेत.
मात्र आजच ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी क्लेव्हर्ली यांच्याऐवजी माजी पंतप्रधान जेम्स कॅमेरून यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जयशंकर यांची चर्चा क्लेव्हर्ली यांच्याशी होणार का कॅमेरून यांच्याशी होणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
जयशंकर यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही आज भेट घेतली आणि त्यांच्याशी भारत आणि ब्रिटनमधील संबंधांच्या अनुषंगाने द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील घडामोडींबाबतही दोन्ही नेत्यांनी आपल्या मतांची आदान प्रदान केली.