आळंदी -डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी (पुणे)च्या वतीने उन्नत भारत अभियानातंर्गत पाच गावे चऱ्होली खुर्द, सोळू, वडगाव घेनंद, कोयाळी, भोसे दत्तक घेतली असून प्रत्येक गावात 40 या प्रमाणे 200 जीवनावश्यक किट गरजू कुटुंबांना देण्यात येत आहेत. त्यापैकी आज वडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी किटचे वाटप केले. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर यांना मास्क व सॅनिटायझर वाटप केले.
या वेळी सरपंच शशिकला घेनंद, इतर सदस्य ग्रामपंचायतमधील कर्मचारी व डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. अमिताभ बॅनर्जी, विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसीन, उन्नत भारत अभियान समन्वयक, डॉ. श्यामकांत कुलकर्णी (मेडिकल ऑफिसर), जोसेफ चेरीयन (हेल्थ सुप्रिडेंट), संगीता वाडेकर, प्रविण कोल्हे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता), कालिदास तापकीर, पंजाब वैरागड, रामदास भाकरे, अनंता शिंदे, तसेच वडगाव आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी, आशा वर्कर उपस्थित होते.