खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी नडाल येथील पंचतारायन मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील सावरोली गणेश मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ८) घडली. मात्र खालापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करीत फिरवल्याने सावरोली गणेश मंदिराच्या चोरट्याला २४ तासांच्या आत चोरट्यांना अटक केली.
पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरोली गणेश मंदिरातील गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर दानपेटी ठेवण्यात आली आहे. गुरुवारी एक चोरट्याने रात्रीच्या वेळी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि गाभ्याऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मूर्ती समोरील दानपेटी चोरून नेली.
गुरुवारी सकाळी भक्तगण नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले असता चोरीची ही घटना उघडकीस आली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे खालापूर पोलिसांनी चोरट्याला 24 तासाच्या आत अटक केली. ०खालापूर पोलिसाच्या या कामगिरी बद्दल गणेश मंदिर कमिटीने पोलिसांचे अभिनंदन केले आहे.