Doha Diamond League 2024 Highlights :- भारताचा गोल्डन बॉयला येथील डायमंड लीग स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदकाचा बचाव करता आला नाही. कारण, नीरजला 6 फेऱ्यांनंतर 88.36 मीटरच्या सर्वोत्तम थ्रो सह स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. चेक प्रजासत्ताकचा जाकुब वादले नीरजपेक्षा अवघ्या 0.02 मीटरच्या म्हणजेच 88.38 मी. फरकाने भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. ज्यामुळे नीरजला रौप्य पदाकावर समाधान मानावे लागले.
दोहा डायमंड लीग में 88.36 मीटर भाला फेंक कर अपना अब तक का सर्वश्रेष्ठ प्रदर्शन कर देश के सिरमौर नीरज चोपड़ा द्वारा दूसरा स्थान हासिल करने पर बहुत बहुत बधाइयाँ💐#NeerajChopra pic.twitter.com/3AnOFl1F7Q
— Yogeshwar Dutt (मोदी का परिवार) (@DuttYogi) May 11, 2024
भारताचा अन्य भालाफेकपटू किशोर जेनाला 10 खेळाडूंमध्ये 9 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.31 मीटरची सर्वोत्तम थ्रो केला. शनिवारी झालेल्या स्पर्धेत नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 84.93 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 86.24 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.18 मीटर, पाचव्या प्रयत्नात 82.28 मीटर आणि शेवटच्या प्रयत्नात 88.36 मीटर अशी लांब फेक केली.
सुवर्णपदक विजेत्या याकुबच्या पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात फाऊल झाले. त्याने पहिल्या प्रयत्नात 85.87 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 86.93 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 88.38 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 84.04 मीटर अशी लांब फेक केली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो फेकला, जो नीरजच्या सर्वोत्तम थ्रोपेक्षा सरस ठरला.
दोहा डायमंड लीग 2023 मध्ये सुवर्ण जिंकले
गेल्या वर्षी याच स्पर्धेत चोप्राने 88.67 मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी जाकुब वडलेच दुसऱ्या स्थानावर होता. अवघ्या ०.०४ मीटरने त्याने अव्वल क्रमांक गमावला होता. तथापि, वडलेजने 2023 मध्ये यूजीन येथे झालेल्या अंतिम फेरीत नीरजचा पराभव करून डायमंड लीगचा मुकुट जिंकला. यावेळी दोहामध्येही वडलेचने नीरजचा पराभव केला.
गेल्या वर्षी मी 90 फेक करेन असे सांगितले होते. या वर्षीही माझा तोच प्रयत्न आहे. मी 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 फेक केल्यापासून लोक माझ्याकडून ही अपेक्षा करत आहेत. पण, त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, माझ्या कोपराला झालेली दुखापत, शस्त्रक्रिया ज्यामुळे आता मी 88 ते 90 मीटरमध्ये अडकलो आहे.
– नीरज चोप्रा, भारतीय भालाफेकपटू
पीटर्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर
ग्रेनेडाचा पीटर्स अँडरसन तिसरा, फिनलंडचा हेलँडर ऑलिव्हर चौथा आणि मोल्दोव्हाचा मार्डेअर अँड्रियन पाचव्या स्थानावर होता. अँडरसनचा सर्वोत्तम थ्रो ८६.६२ मीटर, ऑलिव्हरचा ८३.९९ आणि अँड्रियनचा ८१.३३ मीटर होता.
World Olympic Wrestling Qualifiers 2024 : कुस्तीपटू निशा दहियाची ऐतिहासिक कामगिरी….
जेना केवळ 3 प्रयत्नांनंतर शर्यतीतून बाहेर
भारतीय किशोर जेना 3 प्रयत्नांनंतर केवळ 9व्या स्थानावर राहू शकला, ज्यामुळे त्याला शेवटचे 3 प्रयत्न मिळाले नाहीत. जेनाने पहिल्या प्रयत्नात 75.72 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 76.31 मीटर फेक केली. त्याचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला. अमेरिकेचा थॉम्पसन कर्टिस दहाव्या क्रमांकावर होता.