औडेन – साधारणपणे जगाच्या पाठीवरील कोणताही देश असला तरी घटस्फोट हा विषय नेहमीच चर्चा न करण्याचा नकारात्मक विषय मानला जातो. पण पश्चिम आफ्रिकेतील मॉरीटेनिया हा असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी घटस्फोट साजरा केला जातो. या देशामध्ये कित्येक वर्ष घटस्फोट साजरा करण्याची परंपरा पाळली जात आहे आणि आता आधुनिक काळाप्रमाणे या परंपरेमध्ये आणखीन काय सुधारणाही करण्यात येणार आहेत.
घटस्फोट घेण्यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नाही किंवा लाज बाळगण्यासारखे त्यात काही नाही. असे या देशातील नागरिकांना वाटत नाही घटस्फोट घेणे ही एक सवय आणि जीवनशैली झाली आहे. अनेक स्त्रिया आणि पुरुष आपल्या वैवाहिक आयुष्यात अनेक वेळा घटस्फोट घेताना दिसतात महिला जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा त्या खास घटस्फोटांच्या पार्टीचे नियोजन करतात आणि आता मी स्वतंत्र असून पुन्हा लग्न करायला तयार आहे अशा प्रकारची माहिती या पार्टीमध्ये दिली जाते.
एखाद्या लग्न समारंभामध्ये जेवढा उत्साह दाखवला जातो तेवढाच उत्साह या घटस्फोटाच्या पार्टीमध्ये सुद्धा दिसून येतो. अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याने आता आधुनिक काळात नव्या पिढीसाठी त्यात आणखीन काही बदल करण्यात आले आहेत. घटस्फोटाच्या पार्टीसाठी खास केक तयार करण्यात येतात सोशल मीडियावर याबाबत जाहिरातही केली जाते आणि विशेष संगीत समारंभाचेही आयोजन केले जाते.
घटस्फोट विधी पार पडल्यानंतर घटस्फोटीत महिला जुन्या बाजारात जाऊन आपल्या जुन्या विवाहातील सर्व कपडे आणि इतर वस्तूंची विक्री करतात. जुन्या विवाहाची कोणतीही खूण राहू नये याची दक्षता घेतली जाते. हा देश मुस्लिम असला तरी तेथील महिलांना अधिक स्वातंत्र्य आहे आणि मुस्लिम महिलासुद्धा घटस्फोटानंतर पार्टी साजरी करतात. जगातील सर्व देशांमध्ये घटस्फोट घेण्याचे सर्वाधिक प्रमाण या देशामध्ये असल्याचे सांगण्यात येते पण याबाबतचा अधिकृत पुरावा उपलब्ध झालेला नाही.