मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील कुटुंबांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 हजार 450 टन तांदूळ रेशनकार्ड धारकांना घरपोच वाटप करण्यात आला. ग्रामपंचायत आणि रेशनदुकानदार अशोक दळवी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. शासनाकडून रेशनकार्ड धारकांना प्रति माणसी पाच किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे. अवसरी बुद्रुक येथे सरपंच पवनकुमार हिले, उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, प्रशांत वाडेकर, गेनभाऊ हिंगे, स्वप्नील हिंगे, कल्याण हिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव हिंगे, पोलीस पाटील माधुरी जाधप यांनी तांदूळ वाटपाचे नियोजन केले. ग्रामपंचायत सदस्यांनी वर्गणी काढून टेम्पोचे भाडे दिले.