शिक्रापूर- रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने करोनाच्या प्रतिबंधासाठी शिक्रापूर व तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले आहे. शिक्रापूर येथे आयोजित कार्यक्रमात फेस शिल्डचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 300 शिल्ड वाटण्यात आल्या आहेत. रोटरीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष मयूर करंजे, सचिव प्रीतम शिर्के, संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. राम पोटे, लद्धाराम पटेल, रवींद्र पाटील उपस्थित होते. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशीद, तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी रोटरीचे कौतूक केले. कार्यक्रमासाठी डॉ. श्रीकांत साकोरे व सचिन खेडकर यांचे सहकार्य लाभले.