खडकी (प्रतिनिधी) : खडकी येथे श्रीराम मंगल कार्यालय परिसरातील एका इमारतीसमोरील वायरमध्ये अडकलेल्या कबुतराची सुटका पक्षी मित्र आणि खडकी अग्निशामक दलाच्या जवानांनी केली.
सकाळी काही नागरिकांना एक कबुतर वायरमध्ये अडकलेले दिसले. ते कबुतर वायरमधून स्वतः ला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यात ते अजून अडकले गेले. त्याचवेळेस सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भाटी यांनी वेळीच त्यांचे पक्षीमित्र पवन सबरवाल याना फोन करुन कबुतर अडकलेल्याची माहिती दिली.
पवन सबलवार यांनी खडकी कॅन्टोमेंटचे आरोग्य अधिकारी बी एस नाईक आणि अग्निशमन कर्मचारी अजित खैराले यांना फोन करून अग्निशमन दलाचे जवान व गाडी मागवून घेतली. अग्निशमनदलाची गाडीही 10 मिनिटात पोहचतास खडकी कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून दहा मिनिटात त्या कबुतराची सुटका केली. खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे जवान अजित खैराले,विशाल वाळुंज,तेजस बारणे,प्रशांत पवार,महेश काशीद यांनी ही कामगिरी बजाविली