नेवासा – नेवासा तालुक्यातील भेंडा येथे शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा, नेवासा यांच्यामार्फत “मोफत फिरते वाचनालय पुस्तक आपल्या भेटीला’ हा उपक्रम आता चळवळीचे स्वरूप धारण करु लागला आहे. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण नवले, सुखदेव फुलारी, नामदेव शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ.अशोकराव ढगे यांनी उपक्रमाची माहिती दिली. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे नेवासा शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर धनवटे यांनी ग्रामस्थांना पुस्तक वितरणाचे काम केले. उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाजून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. पांडुरंग रोडगे यांनी पुस्तकाची सुबक मांडणी करून पुस्तकाची महती वैयक्तिक पातळीवर सांगितली. कार्यक्रमाला सरपंच वैभव नवले, उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, अशोकराव उगले , राम हरी ठुबे गुरुजी, भाऊसाहेब पंडित, ह प गणेश महाराज चौधरी, रामेश्वर गव्हाणे, ज्ञानदेव दाभाडे, बाळासाहेब धनवटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.