पुणे : शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारे उपाय योजना करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शहरातील गोखलेनगर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
गोखलेनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे महापालिकेच्या वतीने या परीसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.