मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो.
दिशा पाटणी ची ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चांगलीच लोकप्रिय असून, तिचा फॅन फॉलोइंग सुद्धा जबरदस्त आहे. मात्र, दिशा प्रमाणेच एक स्पॅनिश अभिनेत्री आहे जी हुबेहूब दिशासारखी दिसते. “पेनेलोप क्रूज’ असं या स्पॅनिश अभिनेत्रीचं नाव आहे.
पेनेलोपनं वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केलं आणि 16 व्या वर्षी टीव्हीवर दिसू लागली. या दोघींचा ही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
पेनेलोप क्रूजनं 1992 साली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ती लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करु लागली. दिशा आणि पेनेलोप आपल्या हॉट अँड ग्लॅमर्स लूक साठी सतत चर्चेत असतात.
जर तुम्हाला दिशा पाटणी आणि पेनेलोप क्रूज सोबत दिसल्या तर तुम्हीही एका क्षणासाठी गोंधळात पडणार आहात कारण दोघीही सारख्याच दिसतात. सोशल मीडियावर या दोघींच्याही फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो.