तामिळनाडूमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. वेल्लोर येथे एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तिच्या अंगावरील कपडे काढून ओढून नेण्यात आले. 120 गुंडांनी मिळून महिलेसोबत हे अत्याचार केले. एवढेच नाही तर या महिलेचा नवरा भारतीय लष्करात असून तो सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पतीचे नाव प्रभाकरन असून संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तामिळनाडू सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
The wife of a soldier posted in #Kashmir has been stripped naked and beaten badly. The @mkstalin Govt of #TamilNadu is not protecting the families of soldiers who give their lives to protect the country. (1/2)@BJP4TamilNadu @annamalai_k @tnpoliceofflpic.twitter.com/nsa2n7AatG
— ShriRaj Tripute (@ShriRajTripute_) June 11, 2023
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, ‘मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात आहे आणि सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. मी माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून न्याय मागताना दिसत आहे.‘
लष्करी जवान हवालदार प्रभाकरन यांच्या पत्नीला स्थानिक गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना काही वेळातच व्हायरल झाली. या महिलेला जीएच वेल्लोर अदुक्कमपराई येथे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अखिल भारतीय माजी सैनिक परिषद तामिळनाडूचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन त्यागराजन वेटरन यांनी घेतली आहे तसेच सांगितले की, ‘मी या घटनेचा निषेध करतो आणि त्वरित कारवाईची विनंती करतो. तो म्हणाला आपण कोणत्या जगात आहोत? लष्कराच्या जवानाची ही दयनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा सैनिक देशाच्या रक्षणासाठी जातो तेव्हा त्या सैनिकाची पत्नी आणि कुटुंबाची काळजी घेणे ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असते. तामिळनाडूमध्ये अशा घटनांमध्ये झालेली वाढ ही अराजक परिस्थिती दर्शवते. ते म्हणाले की, याप्रकरणी तातडीने कारवाई करून महिलांची इज्जत वाचवावी, अशी माझी विनंती आहे.’