वॉशिंग्टन – पर्यावरणाला सर्वात जास्त धोका प्रदूषणाचा असतो आणि हे प्रदूषण वाढवण्यासाठी मोठा हातभार प्लास्टिकच्या वस्तू मुळे लागतो पर्यावरणात अनेक ठिकाणी पसरलेले प्लास्टिक नष्ट होण्यासाठी पाचशे वर्ष लागतात असा एक अंदाज आहे पण आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी अशा एका एंझाइमचा शोध लावला आहे ज्यामुळे प्लास्टिक फक्त आठ दिवसात समूळ नष्ट होऊ शकते युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधील संशोधकांनी शोधलेल्या या एंझाईम मुळे प्लास्टिकचे रूपांतर मातीत होते.
आणि प्लास्टिक नष्ट होऊन जाते नेचर जर्नल नावाच्या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे एंझाईम हे एक प्रकारचे प्रोटीन असून कोणत्याही जीवशास्त्रीय प्रक्रियेचा वेग वाढविण्याचे काम या एंझाईमच्या माध्यमातून होते या तंत्रज्ञानाचा वापर करून एंजाइमच्या साह्याने प्लास्टिकच्या कुजण्याची प्रक्रिया वेगाने करून त्याचे केवळ आठ दिवसात मातीत रूपांतर करणे शक्य होणार आहे जगभरात सध्या जो कचरा निर्माण होतो.
त्यापैकी तब्बल 12 टक्के कचरा हा यूज आणि थ्रो प्रकारातील प्लास्टिक पासून तयार होतो त्यामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि कंटेनर याचा सर्वात जास्त समावेश असतो हे सर्व प्लास्टिक नष्ट व्हायला अनेक वर्षे लागतात पण आता या नवीन संशोधनामुळे प्लास्टिकचे अस्तित्व लवकर संपवणे शक्य होणार आहे या संशोधनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे जे प्लास्टिक नष्ट होणार आहे.
त्याचे पुन्हा रूपांतर होणार आहे त्या मातीचा वापर करून पुन्हा एकदा प्लास्टिकची निर्मिती करणे शक्य होणार आहे 2005 पासून प्लास्टिक नष्ट करणारे एंजाइम वर संशोधन सुरू होते आत्तापर्यंत 19 प्रकारच्या एंझाईम चा शोध लावला होता पण या नवीन शोधामुळे प्लास्टिकचे रीसाइक्लिंग सुद्धा होणार असल्यामुळे त्याला महत्त्व देण्यात येत आहे जिओग्राफिक नेचरने दिलेल्या आकडेवारी प्रमाणे जगभरात दरवर्षी तब्बल 8.3 अब्ज मेट्रिक टन प्लास्टिकची निर्मिती होते त्यापैकी 6.3 अब्ज मेट्रिक टन प्लास्टिकचे कचर्यात रूपांतर होते 12 टक्के प्लास्टिकचे रिसायकलिंग शक्य होते व उर्वरित प्लास्टिक पर्यावरणा मध्येच कचऱ्याच्या स्वरूपात मिसळले जाते.