उंब्रज जिल्हा परिषद शाळेचे तीन वर्ग डिजिटल

उंब्रज (प्रतिनिधी) – उंब्रज, ता. कराड येथील रोटरी क्‍लबच्या हॅप्पी स्कूल उपक्रमाद्वारे रोटरी क्‍लब तसेच कै. रामचंद्र दिनकरराव जाधव-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व शिक्षक-पालक संघ यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेचे तीन वर्ग डिजिटल करण्यात आल्या आहेत.

डिजिटलच्या माध्यमातून वर्गांतील भिंतीना आकर्षक रंगकाम, भिंतीचित्रे, खेळ साहित्य, पंखे व अभ्यासचित्रे लावण्यात आली असून रोटरीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीत रोटरीचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन सोहळा पार पडला.

रोटरी क्‍लबच्या माध्यमातून हॅप्पी स्कूल हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. उंब्रज रोटरी क्‍लबचे पदाधिकारी तसेच कै. रामचंद्र जाधव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या तीन वर्ग डिजिटल करण्यात आले असून मुलांना अभ्यास तक्ते, लाइट फिटींग, कारपेट, बस्करपट्ट्या, खेळ साहित्य व वर्गात पंखे लावण्यात आले आहेत. कै. शिवाजी शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेला एलईडी टी. व्ही. भेट देण्यात आला.

यावेळी सचिव अजित जाधव, प्रोजेक्‍ट लिडर साहेबराव कदम, डॉ. सुनील कोडगुले, प्रमोद शहा, विनोद पटेल, प्रवीण यादव, दिगंबर जाधव, दिपक जाधव, देवदूत शिंदे, निलेश माने, केंद्रप्रमुख हणमंतराव काटे, मुख्याध्यापिका पी. जे. कुर्ले तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते. विनोद माने यांनी प्रास्ताविक केले. वनवे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.