मुंबई – ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आहेत. ज्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच पसंत आहे. या जोडी चे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे.
नुकतेच प्रियांका पती निक जोनासला चिअरअप करण्यास ‘चिअर गर्ल’ म्हणून मैदानात उतरली. तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्राने नुकतेच लॉस अन्जेलीस कॅलिफोर्निया येथील बेसबॉल खेळाच्या मैदानात पती निक जोनासच्या बेसबॉलची मॅच पाहण्यास हजेरी लावली होती. या फोटोत प्रियांका निक जोनासला वॉर्डरोबमधून चिअरअप करताना दिसत आहे.
View this post on Instagram
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट, क्रॉप टॉप आणि लाल रंगाची पँन्ट घातली आहे. निक पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बेसबॉल खेळताना दिसत आहे. या कपलने यावेळी बेसबॉल खेळाचा मननुराद आनंद लुटला. याच दरम्यान प्रियांने एका चिमुरडीसमोर डान्सदेखील केला.