पारनेर – आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांवर अमानुषपणे लाठीमार करणारी घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवली (सराटी) येथील मराठा समाजातील बांधवांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेधाचे निवेदन बामसेफ जिल्हा प्रभारी राजेंद्र करंदीकर व आरपीआय तालुकाध्यक्ष किरण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देण्यात आले.
निवेदनावर महिला आघाडी तालुकाध्यक्ष माही सूर्यवंशी, शहराध्यक्ष निखील गायकवाड, शहराध्यक्ष संगम सोनवणे, प्रदीप मोरे, स्वप्नील आल्हाट, अमोल ठुबे, मंगेश कावरे, पुष्कराज बोरुडे, सुनील चौधरी, मनोज सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.