गणेश कुटे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
वाघोली – राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे.
कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे;हे योग्य नाही.
सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे जिल्हाधिकऱ्यांमार्फत माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत करण्यात आल्याची माहिती राज्य सचिव गणेश कुटे यांनी दिली.
योग्य ती कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गणेश कुटे यांनी दिला आहे. निवेदन देताना संदीप सातव, गणेश सातव, शरद आव्हाळे, विजय जाचक आदी मान्यवर उपस्थित होते.