मागील काही दिवसांपासून भारताचे स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या मुलींबाबत सोशल मीडियावर असभ्य कमेंट केल्या जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी १६ जानेवारी (सोमवारी)ला या क्रिकेटपटूंच्या मुलींबद्दल गलिच्छ टिप्पणी केल्याबद्दल ट्विटरवरील ६ खात्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिलेल्या नोटीस आणि सततच्या दबावानंतर दिल्ली पोलीस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ट्विटरला संबंधित खात्यांबद्दल माहिती देण्यासाठीची नोटीसही बजावण्यात आली आहे.
IND vs SL | चाहत्यांनी विचारले, आमचा संजू कुठे आहे? सूर्यकुमारच्या उत्तराने जिंकली मनं!
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील अज्ञात ट्विटर खात्यावरून धोनी आणि कोहलीच्या मुलींच्या फोटोंसह गलिच्छ कमेंट्स केल्या जात होत्या. सोशल मीडियावरील या गलिच्छ ट्विटचे फोटो स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत दिल्ली पोलिसांना याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. “ट्विटरवर काही अकाऊंट्सकडून विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या मुलींच्या फोटोंवर अश्लील कमेंट केल्या जात आहेत. २ वर्ष आणि ७ वर्षांच्या मुलींसाठी इतक्या वाईट कमेंट्स का करता? तुम्हाला खेळाडू आवडत नसतील तर तुम्ही त्यांच्या मुलींवर अत्याचार करणार का?” असा सवाल यावेळी मालीवाल यांनी उपस्थित केला.
जिस तरह कोहली और धोनी की बच्चियों के बारे में भद्दी टिप्पणियाँ ट्विटर पर की जा रही हैं उसी तरह #RohitSharma की पत्नी और बच्ची को भी अभद्रता का निशाना बनाया जा रहा है। चल क्या रहा है ये ? @Delhipolice @MumbaiPolice pic.twitter.com/dZHKz5BD9A
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 12, 2023
स्वाती मालीवाला यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस दिली होती. त्याचबरोबर या प्रकाराबाबत लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. मालीवाला यांनी म्हटले की, “माझ्या सूचनेनंतर दिल्ली पोलिसांनी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या मुलींवर केलेल्या अशोभनीय टिप्पणी प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात टाकले जाईल.” आता दिल्ली पोलीस या प्रकरणाबाबत किती दिवसात आरोपींना अद्दल घडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मेरी नोटिस के बाद दिल्ली पुलिस ने @ImVKohli और @MSDhoni की बेटियों पर हुई अभद्र टिपण्णियों के मामले में FIR दर्ज कर ली है। बहुत जल्द सभी दोषी गिरफ़्तार होंगे और सलाख़ों के पीछे जाएँगे। pic.twitter.com/IPFE7Uky0x
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 16, 2023