नवी दिल्ली – तीन वेळा तहकुब झालेली दिल्ली महापालिकेची निवडणूक आता 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या प्रस्तावाला दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे पण भाजपच्या राजकारणातून त्यांना महापौर निवडण्यात अडथळा आणला जात आहे, त्याच साठी या आधी तीन वेळा भाजपने जाणिवपुर्वक गोंधळ घालून महापालिकेची महापौर निवडीची सभा उधळून लावली होती असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/aap-protests-outside-bjp-headquarters-over-adani-issue/
दिल्लीतील सत्तारूढ पक्षाला न विचारताच राज्यपालांनी तेथे नामनिर्देशित नगरसेवकही नियुक्त केले असून त्यांना मतदानाचा अधिकार नसतानाही महापौर निवडणुकीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी भाजपकडूनही आप वर आरोप केले जात आहेत.