मुंबई – अमेझॉन प्राईम व्हिडीओ’च्या वतीने आज ‘गहराईयां’च्या विशेष वर्ल्ड प्रीमियरची घोषणा करण्यात आली. हा शकुन बत्राचा ‘कपूर अँड सन्स‘नंतरचा दिग्दर्शकीय प्रयत्न असून प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा होती.
ही कलाकृती गुंतागुंतीचे आधुनिक नातेसंबंध, प्रौढता, सोडून देण्याची वृत्ती आणि एखाद्याच्या जीवन मार्गाचे नियंत्रण मिळवण्यावर आधारीत नाट्य आहे. जोउस्का फिल्म्स समवेत धर्मा प्रॉडक्शन्स आणि वायकॉम 18 स्टुडिओजची ही संयुक्त निर्मिती आहे. गहराईयांमध्ये दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा प्रमुख भूमिकेत असून सोबत नसिरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वाच्या व्यक्तिरेखांत झळकतील. या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर खासकरून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 25 जानेवारी 2022 पासून जगभरात 240 हून अधिक देश आणि प्रदेशांत होतो आहे.
View this post on Instagram
“इतक्या वर्षांत आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओत आमच्या ग्राहकांना साजेशा कथा सांगण्यासाठी वचनबद्ध राहिलो” असे अमेझॉन प्राईम व्हिडीओचे हेड ऑफ कंटेंट लायसन्सिंग मनीष मेंघानी यांनी सांगितले. “गहराईयां, ही आमची आगामी ऑफर असून ही कलाकृती आमच्या ग्राहकांवर नक्कीच छाप सोडून राहील. तिची कथाकथनाची पद्धत सिनेचाहत्यांच्या पसंतीस उतरणार आहे. खरोखर ही कथा खास आहे, शकून बत्राने ती हुशारीने गुंफली आहे, गुंतागुंतीच्या मानवी भावना रंगवण्याची क्षमता त्याने पुन्हा सिद्ध केली. या सिनेमामुळे आमची धर्मा प्रॉडक्शनसोबतची भागीदारी बळकट व्हायला मदत झाली आणि आमच्या जगभरातील ग्राहकांसमोर हृदयस्पर्शी कथा घेऊन येताना मनात उत्साह संचारला आहे.”
धर्मा प्रॉडक्शन्सचे करण जोहर म्हणाले की: “गहराई हे आधुनिक नातेसंबंधांचं तीव्र, अस्सल आणि प्रामाणिक निरीक्षण आहे आणि शकुनने मानवी भावनांची गुंतागुंत रंगवण्याचे महत्त्वाचे धनुष्य पेलले आहे. त्याला कलाकारांच्या अदाकारीची प्रामाणिक आणि सशक्त जोड मिळाल्याने फिल्मच्या कथेला चांगली पकड आहे. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओवर गहराईच्या प्रीमियमसाठी उत्सुक आहोत. ही शेरशाहनंतरची आमची दुसरी भागीदारी आहे, कथेचे सूत्र वैश्विक स्तरावर स्वीकारले जाईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. प्रेम आणि मैत्री विरुद्ध एखाद्याची महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि संघर्षाची कथा आहे, भारतीय आणि जगभरातील प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल.”
कपूर अँड सन्सच्या बंपर यशानंतर दिग्दर्शक शकुन बत्रा पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत परतले आहेत, ते सांगतात: “माझ्याकरिता गहराईयां हा केवळ एक सिनेमा नाही. तो मानवी नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, आधुनिक प्रौढ नात्यांचा आरसा आहे, आपण भावना आणि मानसिक आंदोलनातून कसा प्रवास करतो, प्रत्येक पाऊल उचलतो, प्रत्येक निर्णय आपल्या आणि अवतीभोवती असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर कसा परिणाम करणारा ठरतो हे दर्शवतो. अद्वितीय टीम आणि धर्मा प्रॉडक्शनसमवेत या प्रवासात सामील झाल्याबद्दल विशेष आनंद वाटतो, ही कलाकार मंडळी फार प्रतिभावंत आहे आणि आता अमेझॉन प्राईम व्हिडीओची जोड मिळाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आपलासा वाटेल असे माझे मत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा राहील.”