मुंबई – बोल्ड आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोणने एक धक्कदायक खुलासा केला आहे.दीपिकाचा हा खुलासा बॉलिवूडबद्दल नसून हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीबद्दल आहे. या खुलाश्यानंतर सिनेसृष्टीला सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दीपिकाने हॉलिवूडमध्ये भारतीयांसाठी होत असलेल्या वांशिक रूढींविरोधात आवाज उठवला आहे. यासंबंधीचा एक वैयक्तिक अनुभवही तिने शेअर केला आहे.
दीपिकाने 2017 मध्ये अभिनेता विन डिझेलसोबत हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत.एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने हॉलिवूडच्या वांशिक स्टिरियोटाइपबद्दल तिच्या भावना शेअर केल्या आणि तेथील लोक बाहेरील देशांतील लोकांकडे कसे पाहतात हे सांगितले. दीपिकाने XXX: Return आणि Xander Cage ते दर्जेदार हॉलिवूड चित्रपट केले आहेत. परंतु त्यानंतर हॉलिवूड चित्रपट न करण्याचे कारण देखील दीपिकाने यावेळी सांगितले,.ती सांगते एका ओळखीच्या अभिनेत्याला ती एका पार्टीत भेटली त्यावेळी त्याने तिला म्हंटले की त्यामानाने तू चांगली इंग्लिश बोलतेस, त्यावर दीपिका म्हणते कदाचित त्यांना असं वाटत होत की आम्हाला इंग्रजी चांगली येत नाही.या प्रकारला कंटाळून हॉलीवूडपासून लांब राहिल्याचे दीपिका सांगते.
या मुलाखतीनंतर अनेकांनी दीपिकाला ट्रोल केलं तर काहींनी तीच या खुलाश्यासाठी स्वागत देखील केलं. विशेष म्हणजे या चंदेरी दुनियेत दीपिकाने केलेल्या या खुलाश्यानंतर त्यावर भाष्य करण्यासाठी अद्याप तरी कोणी समोर आलं नाही.