नवी दिल्ली – मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात उद्या म्हणजेच 15 डिसेंबर रोजी नाताळच्या सुट्ट्यांपूर्वी न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे.
क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्या. संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या न्यायपीठासमोर क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली, त्या न्यायपिठातील न्या. संजय किशन कौल हे 25 डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. तसेच न्यायपिठातील न्यायाधीश निवृत्त होण्याआधी निकाल देण्याची सर्वसाधरण परंपरा आहे. त्यामुळे उद्याच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर निकाल येण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण वैध की अवैध यावर सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्द्यावर पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.