मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान सध्या अॅक्शनने भरलेल्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचा प्रिव्ह्यू 24 तासांत 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात.
View this post on Instagram
दरम्यान, अश्यातच आता चित्रपटातील खलनायकाचा लूक समोर आला असून, अभिनेता विजय सेतूपतीची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. सध्या विजयच्या लूक्सवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. शाहरुख खानने विजय सेतुपतीची ओळख ‘मौत के सौदागर’ म्हणून केली आहे, ज्याने दोन पॉवरहाऊस कलाकारांमधील धडाकेबाज संघर्षाचे वचन दिले आहे.
दरम्यान, यापूर्वी विजयनं बॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच त्याची ‘फर्जी’ नावाची वेबसीरिज येऊन गेली. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये अभिनेता शाहिद कपूर देखील मुख्य भूमिकेत झळकला होता.