नवी दिल्ली – ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या डेफलिम्पिक स्पर्धेत भारताचा स्टार नेमबाज धनुष श्रीकांतने सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत भारताच्या शौर्य सैनीने ब्रॉंझपदकाची कमाई केली.
धनुषने 10 मीटर एअर रायफल गटात धनुषने 247.5 गुणांची नोंद करत हे यश मिळवले. या गटात दक्षिण कोरियाच्या किम वु याने रजत तर भारताच्या शौर्यने ब्रॉंझपदक मिळवले. नेमबाजांसह भारताच्या बॅडमिंटन संघानेही सांघिक गटात जपानचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत आतापर्यंत भारताची 2 सुवर्ण व 1 ब्रॉंझ अशी एकूण 3 पदके झाली आहेत.