मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोनही पक्ष संघटनांचे दसरा मेळावे चर्चेचा विषय झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य सध्या मुंबईच्या दिशेने लागलेले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जण मुंबईत होणाऱ्या शिंदे आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात ( Dasara Melava ) होणाऱ्या भाषणांची मुद्दे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा ( Dasara Melava ) बीकेसी मैदानावर होत आहे. एकनाथ शिंदे हे सध्या व्यासपीठांवर पोहचले असून काही वेळातच ते भाषणाला सुरूवात करतील…..