संपूर्ण राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचीच चर्चा सुरु आहे. दोन्ही गटांमध्ये सध्या मेळाव्याच्या स्टेजवरून शाब्दिक वार सुरु झाले आहेत. दोन्ही गटांमधील प्रमुख नेत्यांची भाषणे सुरु झाले आहेत. ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले भाषण केले. तर शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील त्यांच्या भाषणाची झलक पाहायला मिळाली. यानंतर थोड्याच वेळात मुख्य भाषणांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवर लावण्यात आलेल्या फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरु आहे.
दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय उद्देश आणि विचारांचे फ्लेक्स आपापल्या सभांच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. यामध्ये ठाकरे गटाकडून भाजपला टार्गेट करण्यात आलेले आहे. ‘मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही’ अशा आशयाचे फ्लेक्स ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले आहे. त्यामुळे राजकीय चर्चा आणखी जोर धरी लागली आहे. ( Dasara Melava Thackeray group’s flex on Shivaji Park Shiv Sena to be a slave of BJP )
आताच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी याठिकाणी पोहोचताच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास वंदन केले आहे. त्यांच्यासोबत त्याचे दोन्ही मुलं आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे बीकेसी मैदानावर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सभास्थळी पोहोचणार आहेत.