बंगलुरू – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व कर्नाटकचे माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांना काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे.
शुक्रवारी अपोलो हॉस्पीटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. शुक्रवारी ते कर्नाटक रक्षणा वेदिके या संस्थेतर्फे आयोंजित करण्यात कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तेथूनच रूग्णालयात नेण्यात आले.
शिवकुमार यांना मनिलॉड्रिंगच्या प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांची तिहार कारागृहातून नुकतीच सुटका करण्यात आली आहे. तेथून ते कर्नाटकात परतल्यानंतर ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले होते.