“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

बारामतीत मुख्यंत्र्यांच्या समोर दिले होते नारे

बारामती- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत बारामतीचे सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ कार्यकर्ते सागर खलाटे यांच्यासह पाच ते सहा अनोळखी कार्यकर्त्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बारामती येथील तिन हत्ती चौकात भाजपच्या वतीने स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा प्रवेश बारामती शहरात होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. “होता कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’, तसेच “एकच वादा अजित दादा’ अशा प्रकारच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या, तसेच डीजे साऊंड सिस्टिम वरून देखील राष्ट्रवादीच्या आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील डीजे साऊंड सिस्टिम बंद करण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भाग पडले होते. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण होते. साऊंड सिस्टीम बंद केले तरी मी स्वतःची साऊंड सिस्टिम घेऊन फिरतो, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस कार्यक्रमा दरम्यान केले होते.

पुणे येथील आयोजित सभेत बारामती येथील सभेत झालेल्या गोंधळ वरून त्यांनी भाष्य केले होते. बारामतीत 370कलम लागू केले की काय असे वक्‍तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर बारामतीच्या घातल्याप्रकरणी युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ तसेच सागर खलाटे यांच्यावर बेकायदा जमाव जमून कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ तसेच भाग्यश्री धायगुडे यांना सभेच्या दिवशी ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.