पुणे – मोक्काच्या गुन्हयात मागील 11 महिने फरार असलेल्या दोघांना समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी चार पथके तयार केली होती. त्यांचा ठावठिकाणा काढण्यासाठी पोलिसांनी कधी झोमॅटो डिलेव्हरी बॉय, कधी दुधवाला तर कधी गॅरेज मेकॅनिकचे वेशभूषा केली होती. मागील 11 महिने ते देशातील विविध भागात ओळख लपवून रहात होते.
शुभम दिपक पवळे (24, रा. लक्ष्मीनगर, गजानन महाराज मठासमोर, दत्तवाडी, पुणे ) आणि आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (22, रा. डुल्या मारुती जवळ, गणेश पेठ, पुणे ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार समर्थ पोलीस ठाण्यात
दाखल असलेल्या गुन्हयात या अगोदर पाच आरोपींना अटक केली असून ते सध्या कारागृहामध्ये आहेत. परंतू दाखल गुन्हयातील दोन आरोपी शुभम पवळे व आकाश सासवडे हे मोस्ट वॉंटेड होते. ते दोघेही मागील 11 महिन्यापासून फरार होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, परिमंडळ स्तरावर व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळया टिम तयार करून शोध सुरु होता.
ते सातत्याने पोलीसांना गुंगारा देत होते. दोन्ही आरोपी हे आपले वास्तव्य लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलून रहात होते. ते गुन्हा दाखल झालेनंतर शिरवळ, सातारा जवळील गांवामध्ये दिवस लपून राहीले होते . नंतर ते दोघे जण सहा महिने वेगवेगळया राज्यात राहीले आहेत.
दरम्यानचे काळात ते जम्मू येथील वैष्णोदेवीला फिरायला गेले होते. त्यांना असे वाटले की आता वातावरण शांत झाले आहे असे समजून ते पुण्यात आले. सुरवातीला ते खडकवासला येथील लॉजला पाच दिवस राहीले होते.
नंतर ते एक महिनाभर साधारण नोव्हेंबर मध्ये देवाची ऊरुळी गांवात एका मित्राकडे राहीले. नंतर ते दोघे डिसेंबर 2021 मध्ये मुंबई येथे बोरीवली पश्चिम येथे भाडयाने घेतलेल्या रुममध्ये एक महिनाभर रहात होते. तसेच ते चार दिवस बारामती येथे सुध्दा नंतर ते दोघे मुंबईहून पुणे येथे आले व ते लोहगांवच्या पुढे वडगांव शिंदे गावातील जाधववस्ती येथे भाडयाने रुम घेवून आपले आस्तीत्व लपवून रहात
होते. आरोपींना ‘पकडण्यासाठी या अगोदर सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे व पोलीस अंमलदार यांनी कधी झोमॅटो डिलेव्हरी बॉय, कधी दुधवाला तर कधी गॅरेज मेकॅनिक बनून आरोपींबाबत माहिती काढत होते. दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी समर्थ पोलीस ठाण्याने चार
टिम तयार केल्या . सकाळी पाच वाजलेपासून योग्य प्रकारे नियोजन करून चारही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून मोस्ट वॉंटेड आरोपींना ताब्यात घेतले . त्यांना मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस
अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सतिश भालेराव, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, शरद वाकसे, संतोष थोरात, सुनिल हासबे, मपोशि छाया देवकर यांनी केली आहे.