सातारा – जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून करंजे येथे भाजी विक्री केल्याप्रकरणी सुशांत शामराव बोराटे (रा. करंजेपेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार धनंजय कुंभार यांनी फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, करोनाला रोखण्यासाठी सातारा शहरात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांसह इतर दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, संशयित बोराटे करंजे पेठेत विनापरवाना कांदा, बटाटा विक्री करत होता. याबाबत पालिकेचे कर्मचारी प्रशांत निकम यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जात संशयिताकडे विक्री परवान्याबाबत विचारणा केली असता तो त्याच्याकडे नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला.