नवी दिल्ली – देशातील कालची नव्या कोविड रूग्णांची संख्या 199 दिवसांच्या नीचांकी पातळीवर नोंदवली गेली आहे. काल दिवसभरात कोविडचे एकूण 22 हजार 842 नवीन रूग्ण आढळून आले.
त्यामुळे देशातील एकूण कोविड रुग्णांची संख्या 3 कोटी 38 लाख 13 हजार 903 वर गेली आहे. देशातील ऍक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या आता आणखी खाली उतरून ती 2 लाख 70 हजार 557 वर गेली आहे. काल दिवसभरात 244 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यामुळे एकूण कोविड मृतांची संख्या 4 लाख 48 हजार 817 वर गेली आहे. कालचा कोविड रिकव्हरी रेट 97.87 असा नोंदवला गेला आहे. दरम्यान देशात कोविड लस देण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आता 90 कोटी 51 लाखांवर गेली आहे.