पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आज 46 केंद्रांवर कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर 8 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तर शहरातील विविध 14 केंद्रांवर 15 ते 18 वर्षांवरील मुलांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि. 4) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 46 केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर प्रत्येकी पाचशे डोसची क्षमता आहे. तसेच इतर आठ केंद्रावर कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर प्रत्येकी 400 डोस उपलब्ध आहेत.
तसेच 15 ते 18 वर्षांवरील लहान मुलांना शहरातील 14 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे.