करोनाचा महाविस्फोट ! सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली – सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाख बधितांची भर पडली. गुरुवारी 24 तासांत तीन लाख 32 हजार 730 बाधितांची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता ही माहिती दिली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या विक्रमी वाढीमुळे देशातील एकूण बधितांची संख्या एक कोटी 62 लाख 63 हजार 695 वर पोहोचली. तर करोना संबंधित आजाराने दोन हजार 263 जण मरण पावले. त्यामुळे मृतांची ही संख्या एक लाख 86 हजार 920 झाली.

करोनाच्या घातक अशा विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. ही स्थिती पाहता देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. अमेरिकेत बाधितांची संख्या भारताच्या तुलनेत दुप्पट आहे. तर मृतांची संख्या तिप्पट आहे.

दिल्लीमध्ये रुग्णालयात ऑक्‍सिजन संपलेला आहे. एका दिवसात तेथे 26 हजार बाधितांची नोंद झाली. 306 जणांचे मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यावर ही ताण येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि दिल्लीसह पाच राज्यांत 75 टक्के बाधित आढळले आहेत. देशात करोना लसीकरण घेणाऱ्यांची संख्या 13 कोटी 53 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 30 लाख जणांना लस देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.