पुणे – करोना रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर आणि लसीकरण ही त्रिसूत्री आवश्यक आहे. शिवाय, डायबेटीस, ब्लडप्रेशर आणि हृदयविकारावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. या सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना करोना उपचारांत गुंतागुंत असते,
असे डॉ.अतुल देशपांडे यांनी सांगितले. नूतन मराठी शाळेतून 1976 साली इयत्ता दहावी एस. एस.सी.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोविड अतिदक्षता विभागातील डॉ. अतुल देशपांडे यांचा
करोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. डॉ. प्रकाश पटवर्धन यांनी साठीनंतर होणाऱ्या मूत्रमार्गातील आजार, तपासण्या आणि उपचार याविषयी माहिती दिली.