कोलकाता – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याच घरात करोनाचा शिरकाव झाला असून त्यांची वहिनी व त्यांच्या आई आणि वडिलांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली याची पत्नी व तिचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीनंतर समोर आले आहे. स्नेहाशिष यांच्या घरातील नोकराला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर घरातील सर्वांची करोना चाचणी घेतली गेली त्यात या तिघांना लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.