मोहाली – भाजप नेते तेजिंदर बग्गा यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलू नये, असे निर्देश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात शनिवारी रात्री उशीरा निर्देश देताना न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. दिल्लीतील एका भाजपच्या नेत्याने मोहाली न्यायालयात तेजिंदर बग्गा यांच्या अटक वॉरंटला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती अनूप चितकारा यांनी बग्गा यांच्या याचिकेवर रात्री उशिरा सुनावणी घेतली.
बग्गा यांच्या वतीने ऍड. चेतन मित्तल यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सांगितले की, 10 मे पर्यंत बग्गा यांच्याविरोधात कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात येणार नसल्याचे निर्देश न्यायालयाने दिले ओहत. न्यायालयाने अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. याबाबत शनिवारी रात्री 45 मिनिटे सुनावणी चालली. त्यानंतर निर्णय देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.