Lok Sabha Election 2024: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 11 वी यादी जाहीर केली आहे. या यादीत 17 उमेदवारांची नावं आहेत. मंगळवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
चार राज्यांतील उमेदवारांची घोषणा –
काँग्रेसने आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 240 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए कांग्रेस उम्मीदवारों के नाम की 11वीं लिस्ट। pic.twitter.com/TpMaGKiSdD
— Congress (@INCIndia) April 2, 2024
यापूर्वी सोमवारी रात्री काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणातील दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसने महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातून डॉ. अभय काशिनाथ पाटील आणि तेलंगणातील वारंगल मतदारसंघातून कडियाम काव्या यांना उमेदवारी दिली आहे.
बिहारसाठी काँग्रेसची पहिली यादी
बिहारसाठी काँग्रेसची ही पहिली यादी आहे. यामध्ये दोन मुस्लिम नेत्यांना तिकीट मिळाले आहे. मोहम्मद जावेद हे किशनगंजचे विद्यमान खासदार आहेत. अजित शर्मा हे आमदार आहेत. त्याच वेळी, तारिक अन्वर हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर सीटबाबत दिल्लीच्या बैठकीत जोरदार मंथन झाले. अनेक नेते अजित शर्मा यांच्या बाजूने होते, पण एक नेता भागलपूर ही ओबीसी जागा असून येथून फक्त ओबीसींनीच निवडणूक लढवावी यावर ठाम राहिले. बऱ्याच विचारमंथनानंतर शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
आंध्र प्रदेशचे सीएम जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीला तिकीट
आंध्र प्रदेशातील कडप्पा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वायएस शर्मिला रेड्डी यांना तिकीट दिले आहे. त्या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या धाकट्या बहीण आहेत.
शर्मिला त्यांचे भाऊ जगनपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. शर्मिलांचा विवाह अनिल कुमार यांच्याशी झाला, जे आंध्र प्रदेशात धार्मिक प्रचारासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना राजा रेड्डी आणि अंजली रेड्डी अशी दोन मुले आहेत.
भाजप खासदार काँग्रेसमध्ये दाखल –
आज सकाळी बिहारमधील भाजप खासदार अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस निषाद यांना मुझफ्फरपूर लोकसभेतून उमेदवार बनवू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर निवडणूक लढविण्याबाबत अजय निषाद म्हणाले की, पक्ष हायकमांड याबाबत निर्णय घेईल. गेल्या काही दिवसांपासून मला भाजपमध्ये काम करताना अस्वस्थता वाटत होती.
19 एप्रिलपासून सात टप्प्यात मतदान –
लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस द्वारा आंध्र प्रदेश में आगामी विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों के नाम की सूची जारी की गई। pic.twitter.com/RRN1oXwRzz
— Congress (@INCIndia) April 2, 2024