तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – येथील इंद्रायणी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. या वेळी युनिक ॲकॅडमीचे केतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी महाविद्यालय व युनिक ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्राणी महाविद्यालयात सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. रुपेश पाटील, संयोजक प्रा. डॉ. सुरेश देवढे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. केतन पाटील यांनीस्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासाबाबत घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.
तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पदांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले. आभार वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुरेश देवढे यांनी मानले.