पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचव महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सायकल टू वर्क थर्सडे उपक्रमाचा आज गुरुवारी (दि. ७) आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पहिल्याच गुरुवारी आयुक्त सिंह स्वतः त्यांच्या निवासस्थानापासून महापालिकेपर्यंत सायकवरुन आले.
आयुक्त सिंह हे स्वतः सायकवरुन महापालिका भवनात पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनिल पवार, कनिष्ठ अभियंता सुनिल बेळगावकर, संतोष कुदळे, कॉम्प्युटर ऑपरेटर अनंत चुटके तसेच पिंपरी-चिंचवडचे बायसिकल मेयर आशिक जैन तसेच कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील प्रदूषण, रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या, वाढते शहरी तापमान या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग तितकाच महत्वाचा असून प्रत्येकाने वैयक्तिक पुढाकार घेऊन या उपक्रमांमध्ये हातभार लावणे गरजेचे आहे.
दर गुरूवारी सायकल टू वर्क थर्सडे या उपक्रमात महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरिकही सायकलचा वापर करून निरोगी आणि पर्यावरणपुरक भविष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि तरूण पिढीलाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात, असे आयुक्त सिंह यांनी म्हटले आहे.